पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

मुंबई (वृत्तसंस्था) चेंबूर पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने घशाच्या कर्करोगाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. संपत दत्तात्रय गाढवे (५८) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या घशाचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामावर आले. दुपारी १२ च्या सुमारास गाढवे यांनी स्टोअर रूममध्ये मुलीच्या ओढणीने गळफास घेतला. पोलीस हवालदार तुपारे स्टोर रूममध्ये जाताच, त्यांना गाढवे यांचा मृतदेह लटकलेला दिसला. अन्य सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले. परंतू डॉक्टरांनी गाढवे यांना मृत घोषित केले. गाढवे यांनी सुसाईड नोट मध्ये कॅन्सरच्या आजाराने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.

Protected Content