जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज पार्कजवळील द्रौपती नगरातून एका पोलीस कर्मचाऱ्याची ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिरालाल सिताराम गुमळकर रा. नवीन पोलीस लाईन, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलात पोलिस कर्मचारी म्हणून नोकरीला आहे. २७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ते २८ मे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, त्यांची दुचाकी (एमएच १९ बीएक्स ५५९२) ही पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. या प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस कर्मचारी हिरालाल गुमळकर यांनी परिसरात शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर मंगळवार ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.