फ़ैजपूर, प्रतिनिधी । प्रवीण मुंडे यांनी जळगाव जिल्हा पोलिस दलाचा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला सरप्राईज विजीट देत असून फ़ैजपूर पोलीस स्टेशनला दुपारी एक वाजेच्या सुमारास भेट दिली.
फ़ैजपूर भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थान, पोलीस स्टेशनची प्रशासकीय इमारत याबाबत माहिती घेऊन निवासस्थानाचे निवासस्थाने तसेच पोलिस स्टेशनच्या आरक्षित जागेसंदर्भात माहिती जाणून घेतली. पोलिस स्टेशनचे कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले व त्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पोलिस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले कार्य प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे पार पडावे जेणेकरून पोलिसाबद्दल जनमानसात पोलिसांची प्रतिमा उंचावेल. पोलीस स्टेशनला आलेल्या प्रत्येक तक्रारदाराचे समस्या समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून आपण त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असा मोलाचा सल्ला दिला असून गुन्हेगारांवर योग्य तो कायद्याचा वचक ठेवण्यासाठी पोलिस हा कोठेही कमी पडणार नाही या दृष्टीने त्यांच्यावर वेळोवेळी योग्य ती कार्यवाही करून तसेच त्यांचे अभिलेख अद्ययावत ठेवावे. पोलिसांनी अवैध धंद्यावर वेळोवेळी प्रभावी कार्यवाही करावी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना काही अडचण समस्या असल्यास त्यांनी समाधान हेल्पलाईनचा वापर करून त्यांच्या अडचणी मांडाव्यात असे योग्य मार्गदर्शन केले आहे.