मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यातील आयपीएस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी देण्यात आले. परंतु लगेचच या बदल्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. या बदल्यावरून मविआत मतभेद उघड झाले आहेत. मविआच्या या कारभाराबद्दल टीका केली जात असून गृहमंत्र्यांनी पद सोडून द्यावे, अशी टीका माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देऊन १२ तास होत नाहीत तोच त्यातील १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशाला स्थगिती देण्यात आली. पोलिसांच्या बदल्याचे अधिकार पोलीस महासंचालक यांचे असून सर्वात जास्त बदल्या ठाणे जिल्ह्यातील आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री आणि विशेषता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेतले नाही म्हणून ५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या बदल्या पदोन्नतीमुळे चागले अधिकारी आले, तर अडचणीत येऊ अशी भीती नगरविकासमंत्री यांना वाटली असावी, या नाराजीतूनच या बदल्या पदोन्नती रद्द करण्याचे आदेश देण्याची नामुष्की गृहखात्यावर आली. बदल्या पदोन्नती संदर्भात गृहमंत्र्यांवर दबाव असेल तर वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद सोडून द्यावे अशी खोचक टीका माजी मंत्री मुनगंटीवार यांनी केली.