मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यातील आयपीएस भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले. बदली करण्यात आलेल्यांमध्ये धडक कारवाई आणि आपल्या निर्णयांमुळे चर्चेत
असलेले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश आहे.
राज्यात भोंगे महाआरत्या च्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षा आढावा बैठक गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली होती, या बैठकीनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही
वळसे-पाटील यांनी सांगितले होते. त्यांनंतर लगेचच सायंकाळनंतर राज्यातील आयपीएस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांचा आदेश देण्यात आले.
यात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना तर भारंबे यांच्या जागी सुहास वारके यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त, नाशिक शहर पोलीस उपायुक्त पदावर जयंत
नाईकनवरे, राज्य मानवी हक्क आयोग येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून डॉ. रवींद्र शिसवे तर पुणे शहर सहआयुक्तपदावर संदीप कर्णिक यांना बढती देण्यात आली. पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुरेशकुमार मेकला, तर
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक तर राज्य पोलीस दलाच्या आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक लख्मी गौतम यांना बढती देण्यात आली आहे. सागरी सुरक्षेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सत्यनारायण तर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदि अंकुश शिंदे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.