यावल, प्रतिनिधी । तालुक्यात नानाजी देशमुख कृषि संजवीनी प्रकल्प अंतर्गत मनवेल व दगडी या ग्रामीण क्षेत्रातील गावातील पात्र लाभार्थाना १० शेळ्या व १ बोकड वाटप सरपंच नरेद्र पाटील ,कृषि सहाय्यक मार्तण्ड मिटके, पशु वैद्यकीय अधिकारी मनोज पाटील यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले.
ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व त्याना जोड धंदा मिळावा या उदेशाने दगडी व मनवेल येथील भुमीहीन शेतमजुराना शेळ्या वाटप करण्यात आल्यात मनवेल ,दगडी, थोरगव्हाण, पथराडे ,शिरागड या गावाची पोखरा (अंतर्गत प्रोजेक्ट आँन रीसायल्ट अँग्रीकल्चर ) महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने गावांची निवड करण्यात आली असुन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांवर सबसिडीवर ( अनुदान ) मिळत असल्याचे समुह साह्यक अधिकार पाटील यांनी सांगितले. राज्य शासनातर्फ नानासाहेब देशमुख कृषि संजिवनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.शाश्वत शेतीतुन शेती उत्पन्न वाढविणे ,शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य मिळवुन देणे असा या योजनेच्या उद्देश असुन.या उद्देशाने अनेक भुमीहीन लाभार्थाना या योजनेचा लाभ मिळाले असल्याचे कृषि साहय्यक मार्तण्ड मिटके व समुह साह्यक अधिकार पाटील यांनी सांगितले.