‘पैसे निकालो, नही तो मार डालेंगे’ धमकी देत तरूणाची दुचाकी लांबविली

चोपडा प्रतिनिधी ।  तरूणाची दुचाकी आडवत दोन जणांनी धमकी देत ‘पैसे निकालो नाही तो मार डालेंगे’ अशी धमकी देत तरूणाची दुचाकी लांबविल्याची घटना आडगाव विरवाडे रोडवर घडली. चोपडा शहर पोलीसात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, इकबालोद्दीन समशोद्दिन जहागरीदार (वय-३७) रा. चोपडा जि. जळगाव हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. ३० डिसेंबर रोजी रात्री ११ ते ११.१५ वाजेच्या दरम्यान ते दुचाकी (एमएच १९ सीसी ८२०५) ने घरी जात असतांना आडगाव विरवाडे रस्त्यावर अज्ञात दोन जणांनी त्यांच्या दुचाकीला हात दिला. त्यावेळी इकबालोद्दिन यांनी दुचाकी थांबविली. यावेळी अज्ञातांना त्याचा हात पकडून ‘पैसे निकालो नही तो मार डालेंगे’ असे म्हणून जबरी पैसे मागितले. इकबालोद्दीन हे भितीने दुचाकी सोडून पळाले. त्यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांची दुचाकी घेवून पसार झाले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक विसावे करीत आहे.

Protected Content