पैसा कमावणे हाच शिवसेनेचा धंदा : नारायण राणे

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) नाणारला पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. ८० टक्के म्हणजे १०० टक्केच समर्थन झाले. शिवसेनेचे हे घुमजाव आहे. नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

 

नारायण राणे पुढे म्हणाले की, नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार आहे. भाजपसोबत सत्तेमध्ये असताना शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असून नाणारला पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. ८० टक्के म्हणजे १०० टक्केच समर्थन झाले. ८० टक्के समर्थन होत नाही. शिवसेनेचे हे घुमजाव आहे, असे नारायण राणे म्हणाले.विरोधानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही नाणारचा मुद्दा पुढे आला होता.

Protected Content