जळगाव प्रतिनिधी। पैशांसाठी गाडी गहाण ठेवली, पुन्हा गाडी दिली नाही, यामुळे वाद होवून दोन कुटुंबिय तक्रारीसाठी शहर पोलीस ठाण्यात पोहचले. याठिकाणी दोघा कुटुंबियांमध्ये शहर पोलीस ठाण्यात वाद झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेंदालाल मील मध्ये कुटूंब एकमेकां शेजारी राहतात. पैशांसाठी एका कुटुंबियांने शेजार्याकडे गाडी गहाण ठेवली होती. यानंतर व्यवहार पूर्ण झाल्याने पुन्हा गाडी मागितली असता, तरुणाने दुचाकी देण्यास नकार दिला. त्यावरुन दोघा कुटुंबियांमध्ये वाद झाला. हा वाद शुक्रवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात पोहचला. पोलीस ठाण्यात दोघे कुटुंबिय एकमेकांना भिडले. संबंधित तरुण आरडाओरड करुन गोंधळ घालत होता. या आवाजाने गर्दी जमा झाली होती. गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी मध्यस्थी करुन दोघा कुटुंबियांवर नियंत्रण मिळविले. दरम्यान याप्रकरणी उशीरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.