जळगाव प्रतिनिधी । उसनवारीच्या पैश्यांच्या वादातून दोघा भावांकडून तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. एकाला अटक करण्यात आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनोज सुकदेव गजरे (वय-३२) रा. रेल्वे कॉटर जळगाव हे आपल्या आई व कुटुंबासह राहतात. त्यांची आई दौपताबाई गजरे यांनी येथील परिसरातील निखील भगवान ढाईतिलक यांच्याकडून दोन हजार रूपये उसनवारीने आठ दिवसांपुर्वी घेतले होते. निखीलने उसनवारीने घेतलेले पैसे मागितले. यात मनोज गजरे आणि संशयित आरोपी निखील भगवान ढाईतिलक व त्याचा भाऊ पुरूषोत्तम उर्फ पंकज भगवान ढाईतिलक दोन्ही रा.शिवाजी नगरातील बुध्द मंदीराजवळ, जळगाव यांच्यात शाब्दिक चकमक होवून हाणामारीत झाले. निखीलने मनोजच्या डोक्याला व उजव्या हाताला बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पो.कॉ. गणेश शिरसाळे, तेजस मराठे, योगेश इंदाटे, दिपक सोनवणे, सुधीर साळवे, प्रणेश ठाकूर यांनी रात्री उशीरा संशयित आरोपी निखील भगवान ढाईतिलक याला घरातून अटक केली. पुढील तपास पोउनि जगदीश मोरे करीत आहे.