चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील प्रभात नगरातील माहेर असलेल्या एका विवाहितेला पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी शहर पोलीसात पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील प्रभात नगरातील माहेर असलेल्या पार्वतीबाई इंदलसिंग चितोडिया या विवाहितेला सुरुवातीला सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र विवाहाला पाच वर्षे उलटताच पतीसह सासरच्या मंडळींनी पैशासाठी शारीरिक व मानसिक छळाला सुरुवात केली. दरम्यान शारीरिक व मानसिक छळ करीत असताना गांजपाठ देखील केला. या सगळ्या गोष्टीला वैतागून विवाहितेने चाळीसगाव शहर पोलीस ठाणे गाठून पती इंदलसिंग सोनपालसिंग चितोडिया, सासरे सोनपालसिंग चितोडिया, सासू शांतीबाई चितोडिया, जेठ मंगलसिंग चितोडिया, दीर बल्लूसिंग चितोडिया, दीर दुदुसिंग चितोडिया, सर्व रा. धार उंबरे ता. हिंजवडी जि. पुणे व रामसिंग पहाडसिंग चितोडिया रा. कामशेत जि. पुणे आदिनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना किशोर पाटील हे करीत आहे.