पैठण कारगृहातील फरार आरोपीविरुध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर परिसरातील आरोपी हा पैठण कारागृहात दाखल असतांना, अभिवचन रजेवर बाहेर पडला. मात्र अभिवचन रजेचा कालावधी संपूनही पुन्हा कारागृहात परतला नाही. या फरार आरोपीविरुध्द जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर येथील आरोपी शेख ईसा शेख पिरण हा एका गुन्ह्यात पैठण कारागृहात दाखल आहे. तो कोरोना काळात आपातकाली परिस्थिती असल्याने अभिवचन रजेवर त्यास बाहेर सोडण्यात आले होते. मात्र अभिवचन रजा संपूनही तो पुन्हा कारागृहात परतला नाही. अनेक दिवस उलटूनही हा आरोपी परत न आल्याने सोमवारी, पैठण कारागृहाचे कर्मचारी रविंद्र नथ्थू बागुल हे जळगावात आले. त्यांनी या आरोपीविरोधात जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.

Protected Content