जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षा दि.४ ते ९ एप्रिल ऐवजी दि.१८ ते २३ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यापूर्वी ४ एप्रिल पासून पेट परीक्षा घेण्याचे घोषित केले होते. तथापी नेट/सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने पेट परीक्षेतून सूट मिळण्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करता ४ एप्रिल पासून परीक्षेचे आयोजन करणे शक्य नसल्यामुळे तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. पीएच.डी. प्रवेश पुर्व परीक्षा १८ ते २३ एप्रिल या कालावधीत विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या इमारतीतील ऑनलाईन परीक्षा केंद्रात होणार आहेत. विद्यार्थ्यांना लॉगईन मधून हॉल तिकिट उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेची सर्व माहिती दिली जाणार आहे अशी माहिती प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी दिली.