जळगाव प्रतिनिधी । परवाना नसतांनाही पेट्रोल भरून देणारा पंपमालक, कर्मचारी व संबंधीत व्यक्ती अशा तिघांसह जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हापेठ पोलीसांच्या पथकाने आनंदा गोविंदा पाटील (वय ४०, रा.गणेशनगर) हा दुचाकीवरून (एमएच-१९, एएक्स-२९६५) जात असल्याने त्याला थांबवून चौकशी केली. त्याने पेट्रोल भरण्यासाठी बाहेर आलो, असे उत्तर दिले. त्यावर पोलिसांनी त्याला पेट्रोल भरण्याचा परवाना आहे का? याची विचारणा केली. त्यावर त्याने काबरा पेट्रोल पंपावर ओळख असल्यामुळे आपल्याला पेट्रोल मिळाले, असे सांगितले. त्यानुसार चौकशीअंती आनंदा पाटीलसह काबरा पेट्रोल पंपाचे मालक मनोज प्रेमराज काबरा व पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी साधना सुनील लांडगे या तिघांविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००