भुसावळ, प्रतिनिधी । देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. भुसावळाचे तहसीलदार दिपक धिवरे यांनी सकाळी ७ ते १० नंतर दुपारी ४ ते ७ अशी वेळ पेट्रोल पंपाच्या मालकांना ठरवून दिलेली आहे.यानंतरही पेट्रोल पंपाचे मालक अवैधरित्या पेट्रोल देतांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळून आल्याने वाहन चालक व पेट्रोल पंप मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
शहरातील जामनेर रोडवरील दीनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर शासनाने ठरविलेल्या वेळेच्या नंतरही पेट्रोल पंपाचे मालक संदीप परमानंद दुधानी ( वय ३० रा. बाबा तुळसीदास मंदिर सिंधी कॉलनी) हे संदीप प्रितमदास कारडा ( वय ३० रा. नवजीवन सोसायटी सिंधी कॉलनी) यांच्या रात्री अँक्टिव्हा एम.एच.१९ सी.ए.७६५२ वाहनामध्ये अवैधरित्या पेट्रोल देतांना मिळून आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रात्री पेट्रोल पंपावर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, स.फै.तस्लिम पठाण,पोना रविंद्र बिऱ्हाडे, पोना रमण सुरळकर,पो ना महेश चौधरी, पो ना उमाकांत पाटील,पो कॉ कृष्णा देशमुख,पो कॉ प्रशांत परदेशी अशांनी मिळून कारवाई केली. पेट्रोल पंप मालक यांच्यावर आधीही बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. दोघांना बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वाहनासह ताब्यात घेऊन कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.