पुस्तक प्रकाशन ; माझ गाव माझा इतिहास

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – तालुक्यातील शिरुड येथील प्रगतिशील आदर्श शेतकरी भालेराव उत्तम पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ वसंतराव नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ सुनील भालेराव पाटील लिखित ‘माझ गाव, माझा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर शिरूड ग्रामपंचायत येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नोकरी निमित्त बाहेरगावी राहणाऱ्या प्राध्यापकाने आपली जन्मभूमी, ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो, त्या गावासाठी काहीतरी वेगळे करावे, गावाचा नाव लौकिक वाढावा, महान कार्याचा विसर पडू नये, नवीन पिढीला त्याच्या कार्याची माहिती व्हावी. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा संदर्भ लक्षात घेण्यासाठी गावाचा इतिहास तसेच काळाच्या पडद्याआड गेलेले घटनाचा गौरवशाली इतिहास ‘माझं गाव माझा इतिहास’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न प्रा. डॉ. सुनिल पाटील यांनी केला आहे.
आ. अनिल पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी पं.स माजी सभापती शाम अहिरे, माजी प्राचार्य.डॉ वसंत देसले, प्राचार्य डॉ.विलास सोनवणे कृउबा च्या तिलोत्तम पाटील, किसान कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रा.सुभाष पाटील, मुडी संस्थेचे संचालक जयवंतराव पाटील,
सरपंच गोविंदा सोनवणे, उपसरपंच कल्याणी पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन, नारायण पाटील, पोपट पाटील, प्रफुल्ल पाटील, योजना पाटील, सुरेश पाटील, आनंदराव पाटील, दिलीप पाटील, धर्मेंद्र पाटील, रवींद्र धनगर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन साने गुरुजी विद्यालय शिक्षक डी. ए. धनगर यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रा. डॉ. सुनील पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी रजनीकांत पाटील, सतिश पाटील, मंथन पाटील आदींनी सहकार्य केले.

 

Protected Content