पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा-भडगाव रस्त्यावर रेल्वेच्या नवगज्या पुलावरून स्विफ्ट डिजायर कार खाली कोसळून अपघात झाल्याची घटना रात्री १२ -१ वाजेच्या सुमारास घडली आहे.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवहानी झाली नाही.दरम्यान,कारमध्ये किती जण होते,याबाबत अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
यासंदर्भात अधिक असे की, गुरुवारी रात्री अ२ ते १ वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिजायर कार (क्र.एम.एच 19 सी यु २४३०) रस्त्यावरून वळण घेत असतांना अचानक नवगज्या पुलावरून अचानक खाली कोसळले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी घडली नाही. परंतु सदर वाहन चालकास जबर मार लागल्याची माहिती समोर येत आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाहीय. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमलेली असून विविध विविध चर्चा सुरू आहे.