पुलवामा (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील सीआरपीएफचे जवान सुनिल काळे हे शहीद झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती आहे.
सुनिल काळे यांनी आज पहाटे 4.30 वाजता झालेल्या चकमकीत 2 अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सुनिल काळे शहीद झाले. सुनिल काळे शहीद झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. आधीच्या वृत्तानुसार पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बंडजू येथे शोध मोहीम सुरू केली.