पुरूष नेत्यांशी संबंध असेल तरच महिलांना तिकिट मिळते

 

 

 

हैदराबाद वृत्तसंस्था । एकीकडे महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा चर्चेत असतांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पुरूष नेत्यांशी संबंध असेल तरच महिलांना तिकिट मिळत असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

‘महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते,’ असं खळबळजनक विधान राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा केलं. त्या हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

यावेळी त्यांनी निवडणुकीत महिलांना डावललं जाण्यावरुन चिंता व्यक्त केली आहे. कोणाताही राजकीय पक्ष महिला नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यासाठी उत्सूक नसतो असं त्यांनी म्हटलंय. महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत महिलांना डावललं जातं,” असं म्हणत त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, “ज्या व्यक्तीची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात, अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जाते,” असं निरीक्षण त्यांनी नोंदवत त्यांनी भारतातील राजकीय पक्षांवर टीका केली आहे.

Protected Content