पुरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या : अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  दोन दिवसापुर्वी  अतिवृष्टी झाल्यामुळे जळगाव जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये नुकसान झालेले आहे.  यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 

निवेदनाचा आशय असा की, जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये  पुराच्या पाण्याच्या तडाख्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांची संपत्ती-गायी, म्हशी, बैल,कोंबडया, शेळी हे प्राणी मृत्यूमुखी पडलेले  आहेत.  शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकांचे फळ बागायतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेती पुराच्या पाण्यात  वाहून गेलेले आहेत. काही ठिकाणी मनुष्य जिवीत हानी देखील झालेली आहे.  या नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे फळ बागायतीचे, पिकांचे तसेच मृत्यूमुखी पडलेल्या गुरा-ढोरांचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन लाख रुपये नुकसान भरपाई त्वरीत द्यावी. यात कुठल्याही प्रकारच्या कागदांची पुर्तता न करता थेट शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत व्हावी. पुराच्या पाण्यात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येकी गायीला रु.७०,०००/- म्हशींना रु.१,००,०००/-, बैलजोडीला रु.१,५०,००० /-  आणि शेळयांना प्रत्येकी रु.५,०००/-, कोबडयांना प्रत्येकी रु.१,०००/-प्रमाणे त्वरीत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी. त्याचप्रमाणे सदरील शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडुन अर्थसहाय्यक कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन द्यावे. तसेच पिक विम्याच्या आर्थिक नुकसानीच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना शेती नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांच्या फळ बागायतीचे नुकसान झालेले आहेत, त्यांना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र धरतीवरती दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईप्रमाणेच जिल्हयातील शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. ज्या शेतकऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्तीची जिवीत हानी झालेली आहे, त्यांना देखील त्वरीत अर्थसहाय्य देण्यात यावे.तसेच पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. सदरील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना  त्वरीत न मिळाल्यास अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी नंदू पाटील, अॅड. सचिन पाटील, प्रवीण पाटील, अॅड. योगेश पाटील, अॅड. वैभवी पाटील, किशोर पाटील, योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.    

https://www.facebook.com/508992935887325/videos/216105063812199

 

Protected Content