पुणे (वृत्तसंस्था) मुसळधार पावसाने आज पुन्हा एकदा पुणे शहराला चांगलेच झोडपून काढले आहे. शिवाजीनगर, धायरी, स्वारगेट, सिंहगड रस्ता, कात्रज, कोथरूड, बाणेर, पुणे विद्यापीठ परिसर, डेक्कन परिसरासह मध्यवर्ती पेठांमध्ये सुमारे पाऊण तास जोरात पाऊस सुरु होता.
पुणे शहरात यंदाच्या आठवड्यात तिसर्यांदा अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वार्यांमुळे ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. पुढील तीन-चार दिवस शहरात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.