पुणे वृत्तसंस्था । कोरोनामुळे निधन झालेल्या रूग्णाला वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यातील मनसेच्या एका नगरसेवकाने संतापाच्या भरात महापालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडली.
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगाराजवळ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती, परंतु वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका येण्यास साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या.
“रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी कसे गाडीत फिरतात?” असा सवाल विचारात नियोजन न केल्यास एकाही अधिकाऱ्याला गाडीने फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी पुणे महापालिकेला दिला.