पुणे वृत्तसंस्था । पुण्यात एका पोलीस पाटलांवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या गोळीबारात सचिन वाळुंज हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या राजगुरुनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींनी वाळुंज यांच्यावर तब्बल चार राऊंड फायर केले. यापैकी एक गोळी त्यांच्या हाताला लागली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे.
आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. या प्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, पुण्यात लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या चिंतेत भर पडली आहे. नुकतेच पुण्यात गांजा-चरस तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी २ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.