अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात नवा उमेदवार येऊन आमदार झाल्याचा मागील मागील दोन पंचवार्षिकचा अनुभव आहे. तशातच यंदा अमळनेर विधानसभा लढवणार असल्याची घोषणा पुण्याचे पोलिस अप्पर आयुक्त साहेबराव पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केलीय. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदार संघातील लढतीत चुरस निर्माण झाली आहे.
पारोळा तामसवाडी येथील असलेले रहिवासी असलेले साहेबराव पाटील हे हल्ली पुण्याचे पोलिस अप्पर आयुक्त आहेत. 30 जून रोजी ते सेवानिवृत्त होत असून त्यांनी अमळनेर तालुक्यात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यापूर्वी लोकसभेला ए.टी.पाटील व आमदार स्मिता वाघ यांचे तिकीट कापल्यानंनतर त्यांचे नाव अचानक पुढे आले होते. मात्र, आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट मिळाले होते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अमळनेर विधानसभा क्षेत्रात वळवला आणि गावोगावी संपर्क सुरू केलाय.
नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठा
येथील सार्वजनिक बांधकाम विश्राम गृहावर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, अमळनेर तालुक्यात नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठा असून आपल्याला पाठिंबा मिळतोय म्हणून आपण रिंगणात उतरलो आहोत. याशिवाय पारोळा तालुक्यातील दोन महसूल मंडल या मतदार संघात येतात. त्यामुळे ही निर्णय घेतला आहे, असे साहेबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना संगितले.
एका बडा नेत्याचा हात
भाजपातील दिल्ली दरबारी असलेल्या तुल्यबळ नेत्याचा साहेबराव पाटील यांना पाठिंबा असून यामुळे त्यांनी आपल जनसंपर्क जलदगतीने वाढवायला सुरुवात केली आहे. नवा चेहरा आणि आयपीएस अधिकारी ही ओळख म्हणून ते सध्या पडद्याआड असले. तरी ते 30 जून नंतर आपले पत्ते उघडतील, याची शक्यता आहे. पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष लढण्याचाही त्यांनी पवित्रा जाहीर केला आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात आता विद्यमान आमदार शिरीष चौधरी, विधानपरिषद आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील,अनिल भाईदास पाटील यांचा इच्छुक उमेदवारात समावेश आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्याची लढत पंचरंगी होणार की काय? असा कयास आता व्यक्त होत आहे.