पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज, पाचोरा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक, जळगाव चौफुली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमात आय.आय.टी. भुवनेश्वर येथून कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये एम. टेक. पूर्ण केलेल्या स्वप्निल मोरे, बी. एस. एफ. मध्ये निवड झालेल्या विजय हटकर, रांगोळी या कला प्रकारात उत्कृष्ट कार्य असलेले शैलेश कुलकर्णी, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी डॉ. विठ्ठल पाटील या मान्यवरांना पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे सुनिल चौधरी यांनी समाजातील यशस्वी मुलींना पुस्तके देऊन सन्मानित केले. समाज बांधवांना उदबोधित करतांना पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. २८ वर्षे कुशल प्रशासन सांभाळणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय व शिस्तप्रिय कार्यकर्तृत्वाचा आदर्श संपूर्ण समाजासाठी कायमच प्रेरणादायी राहील. असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, जळगाव चौफुली येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथ पर्यंत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी धरणगाव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील हटकर, डॉ. मच्छिंद्र परदेशी, बापू हटकर, धोंडू हटकर, निवृत्ती हटकर, विशाल हटकर, जिभाऊ हटकर, भीमा हटकर, विजय हटकर, भटू हटकर, सुभाष हटकर, आखातवाड्याचे माजी सरपंच संजू परदेशी, श्रीराम पाटील, सुनील निळे, नामदेव धनगर, सुनिल रावते, दिपक चिंचोरे, धनराज सूर्यवंशी, सतीश देशमुख, विलास पाटील, स्वप्निल मोरे, डॉ. विठ्ठल पाटील, प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी आदी समाज बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.