जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज ३१ मे रोजी सकाळी अभिवादन करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. याप्रसंगी प्रा.विजय चौधरी, स्टुडंट सेक्शनमधील मिलींद पाटील, सोशल मिडीया प्रमुख गायत्री कुलकर्णी, नर्सिंगच्या प्राजक्ता जंगले, आकाश धनगर, निलेश पाटील, सागर पाटील आदि उपस्थीत होते. याप्रसंगी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.