पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सभा मंडपाचे भूमिपूजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील धनगर समाज महासंघ, जळगाव जिल्हा, मल्हार सेना , अहिल्या महिला संघ व धनगर समाज कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवार, ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन  आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसर, निमखेडी शिवार येथे उत्साहात साजरा झाला. कार्यक्रम स्थळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही होते. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, नगरसेवक चंद्रशेखर पाटील, सुभाष सोनवणे, नाना बोरसे, विभाग नियंत्रक भगवान जगनोर, रमेश सोनवणे, रेखा न्हाळदे, मंजुषा सुर्यवंशी, निलिमा हिवराळे, संगिता ठाकरे, उपकार्यकारी अभियंता एस. बी. रुपनर, विलास नागर, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, प्रभाकर न्हाळदे, संदिप तेले, रामचंद्र चर्‍हाटे, अरुण ठाकरे, सुभाष करे, गजानन निळे, विष्णुआप्पा ठाकरे, बाळासाहेब कंखरे, भरत यवस्कर, रमेश निळे आदी उपस्थित होते.

प्रसंगी सभामंडपाच्या बांधकामाचे भुमिपूजन शहराचे आ. सुरेश भोळे(राजुमामा) हस्ते करण्यात आले. आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या स्थानिक निधीतुन २५ लाख रु.चा निधी सामाजिक सभागृहासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अहिल्यादेवी होळकर प्रगती मंडळ निमखेडी शिवार यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. आ. राजूमामा भोळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. समाजाची प्रगती साधायची असेल तर सामाजिक बांधिलकी जिवंत ठेऊन समाजकार्य घडून आले पाहिजे, असेही आ. भोळे यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुभाष सोनवणे यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या पराक्रमाविषयी माहिती दिली. शाम लोही यांनी अध्यक्षीय भाषणात युवकांनी पराक्रमी महापुरुषांचा सखोल अभ्यास करुन समाजास पुढे न्यावे असे सांगितले. सुत्रसंचलन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, आभार प्रदर्शन धर्मा सोनवणे यांनी केले. यशस्वीतेसाठी अॅड.शरद न्हाऴदे, डाॅ.संजय पाटील, महेंद्र सोनवणे, प्रविण पवार, मुरली धनगर, संतोष कचरे, तुळशिराम सोनवणे, उमेश सुर्यवंशी, यशवंत शिरोळे, मयुर ठाकरे, विनोद सावळे, भरत न्हाऴदे आदींनी परिश्रम घेतलेत. समाज बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी उपस्थिती दिली होती.

Protected Content