पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये औषधं पोहचवणाऱ्यांना एका दुकानातील ३८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुणे शहरात दिवसभरात २०२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४६ वर्षीय तृतीयपंथीयाचा समावेश आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३२९५ झाली आहे. तर मृतांची संख्या १८५ झाली आहे. दरम्यान ६८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत पुण्यात १६९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान,पुणे शहरात औषधं पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोना झाल्यामुळे आज दुपारपर्यंत नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे.