नवी दिल्ली : वृत्तसंस्था । १०० माजी नोकरशहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोकरशहांनी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे.
त्यांनी कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आणि जनतेला उत्तर देण्यासाठी पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे
पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे माहितीच्या अधिकारात पीएम केअर फंडाबाबत माहिती देण्यास नकार देण्यात आला होता आणि हे सार्वजनिक प्रकरण नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिल्याचं या नोकरशहांनी सांगितलं आहे. जर पीएम केअर फंड सार्वजनिक नाही तर मग पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री जे सरकारचे सदस्य आहेत ते आपलं पद, नाव आणि अधिकारांच्या मदतीनंच या फंडमध्ये ट्रस्टी आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
यात अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. माजी आयएएस अनिता अग्निहोत्री, एसपी एम्ब्रोस, सज्जाद हसन, हर्ष मंडेर, अरुणा राय, देव मुखर्जी, सुजाता सिंह, एससी बहर, के सुजाता राव, एएस दुलत यांसारख्या १०० अधिकाऱ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
आज अनेक राज्य कोरोनासारख्या महामारीनं ग्रस्त आहेत. हे राज्य या महामारीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. पीएम केअर फंडातून अशा राज्यांना मदत मिळावी असं आमचं मत असल्याचं माजी नोकरशाहांनी व्यक्त केलं आहे.