रावेर, प्रतिनिधी | पैसा काढला पण गोठा नाही पाणी पुरवठा योजनेत अपहार ई टेंडरमध्ये घोळ वैयक्तिक लाभाच्या योजनेत अनियमतेच्या प्रचंड तक्रारींमुळे रावेरात अधिका-यांना पिआरसीने चांगलेच फैलावर घेतले तसेच उद्याच वस्तुनिष्ट अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. महापुरुषांच्या प्रतिमेच अनादर प्रकरणी जिल्हाच्या बैठकीत गट शिक्षणाधिका-यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती पिआरसी गटप्रमुख आ. अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकारांना दिले.
तिन सदस्य पंचायत राज कमेटीने सायंकाळी सहा वाजता रावेर पंचायत समितीला भेट दिली. भेटपूर्वी पंचायत राज समितीने रावेर तालुक्यातील पाल येथील ग्राम पंचायतीला भेट दिली व घरकुलची पाहणी करून रावेरात पोहचले दरम्यान रावेर पंचायत समितीत आढावा घेण्यासाठी आलेल्या आमदारांच्या समेतीत गट प्रमुख आ अनिल भाईदास पाटील (अमळनेर) आमदार माधवराव जवळगावकर( नांदेड) आमदार डॉ देवराव होळी (गडचीरोली) यांचा सामवेश होता.तर त्यांच्या सोबत विधान मंडळ अधिकारी शशिकांत साखरकर (मुंबई) जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत प्रतिवेदक मैत्रीय कुलकर्णी यांच्या कमेटी सोबत होते.सर्वांचे बीडीओ दिपाली कोतवाल यांनी स्वागत केले.
गटशिक्षणाधिका-यांवर उद्या निर्णय
रावेर महापुरुषांच्या अनादर प्रकरणात गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई संदर्भात जिल्हास्तरावर सिईओंच्या आढावा बैठकीत निर्णय घेतला जाईल असे पंचायत राज समिती सदस्य अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकारांना सांगितले
राष्ट्रवादी कारवाईची मागणी
रावेरात पंचायत राज कमेटी दाखल होताच माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी निळे निशान सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर तसेच साने गुरुजीचे विचारक प्रशांत बोरकर यांनी महापुरुषांचा अनादर प्रकरणात गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मागणी केली