पिडीत मुलीवर अत्याचार करणारा नराधमाला अटक

रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात राहणारी १० दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सावदा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात १० वर्षीय  अल्पवयीन मुलगी हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा प्रदीप सुखा कोळी याने पीडित मुलीला दुकानात बोलवून चॉकलेटचा आमिष दाखवले. त्यानंतर घरात नेऊन तिच्यावरती अश्लिल चाळे करत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर तिच्या आईने सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी संदीप सुखा कोळी याच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील  संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अन्वर तडवी करीत आहे

Protected Content