पिंप्री खुर्द प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाग्रस्त रूग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्य गोपाल चौधरी, सुरेखा पाटील, माजी पं.स.सभापती सुरेखा पाटील, पं.स.माजी उपसभापती यांच्या सौजन्याने रक्तदार शिबीराचे आयोजन केले होते.
संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी मा जि.प.सदस्य गोपाल चौधरी यांची मुलगी चैताली चौधरी, नायब तहसीलदार श्री. मोहोळ, महिला सरपंच संगीत दनशिव, सरपंच अहिरे यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
यावेळी इंडियन रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉ.ए.एम.चौधरी, डॉ. अनिल भोळे, डॉ. रविंद्र जाधव, डॉ. किरण बावसकर, डॉ. भोळे, जमील शेख, सोनवद वैद्यकिय अधिकारी डॉ.संजय सोनवणे, डॉ.गणेश पाटील, डॉ.ऋषिकेश झंवर, श्री खंडारे, जी.बी. पाटील, कैलास पाटील, राहुल पाटील, श्री मोरे, श्री. माळी, सौ वानखेडे,सौ लोखंडे सौ भोळे, गट प्रवर्तक, आशा सेविका व सर्व कर्मचारी परीसरातील नवल दौलत पाटील तरडे, पिंपळे सीमचे सरपंच व्ही.डी. पाटील, अशोक नाना तरडे, राजू पाटील सरपंच भोद, मनोज पांडे, ग्रा.पं. सदस्य पिंप्री, पोलीस पाटील नाना भाऊ, मधुकर बडगुजर, पुडलीक पाटील, मुसळी, रवी टेलर सरपंच वराड, आशिष सपकाळे, गोपाल बापूमित्र परिवार, श्रीराम नगर पिंप्री खुर्द यांचे सहकार्य लाभले.
रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली़ शिबिरस्थळी एक एक मिटरच्या अंतरावर रंगीत चौकट करुन रक्तदात्यांसाठी सोय करण्यात आली होती. शिबिरात वारंवार सॅनीटायझर याचा वापर करुन उपस्थितांचे हात निर्जंतूनीकिरण केले जात होते़ दरम्यान, रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००