पिंप्राळा येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 

जळगाव प्रतिनिधी । खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला महानगर आघाडी आणि गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रूग्णालयातर्फे पिंप्राळा हुडको येथील ज्ञानसाधना माध्यमिक विद्यालयात आज सकाळी मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर, उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे होते.  याप्रसंगी  महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, शहराध्यक्ष डॉ आर.एस.पाटील, डॉ. अशोक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विविध आजारांवर ४०० जणांची मोफत तपासणी

आयोजित केलेल्या शिबीरात डायबेटीज, ब्लड प्रेशर, थाराराईड, लहान मुलांचे आजार, ब्लड गुप चेक करणे, महिलांचे आजार, मानचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध, आतड्यांचे आजार, अशक्तपणा, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, सांधे दुखी यासह विविध आजारांची लक्षणे असणाऱ्या रूग्णांची दुपारी १ वाजेपर्यंत ४०० जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

 

यांनी घेतले परिश्रम

डॉ. नितीन पाटील, डॉ. पंकज महाजन, डॉ.सचिन इंगळे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. हर्षल पाटील, डॉ. शैलेजा चव्हाण, डॉ. शहिद खान, डॉ. वैभव गिरी, डॉ. अतुल सोनार, डॉ. आम्रपाली काकलिया, डॉ. रेणूका चव्हाण, डॉ. रश्मी पाटील, डॉ. स्वप्निल गिरी, डॉ. देवेंद्र कोटांगले, डॉ. अमित नेमाडे, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. सुषमा चौधरी यांच्यासह आदी पथक उपस्थित होते.

Protected Content