पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी असलेले मराठा बटालियन मधील सैनिक जितेंद्र देविदास पाटील यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पिंपळगाव येथे खान्देशी रक्षक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आला.
सैनिक जितेंद्र देवदास पाटील यांनी मराठा बटालियन मध्ये तब्बल २१ वर्षे देशाची सेवा केली असून २००१ मध्ये ते सैन्य दलात भरती झाली होते. पुणे येथील ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग घेऊन त्यांनी देशातील प्रमुख ठिकाणी आपले कर्तव्य बजावून देशाची सेवा केली आहे. यामध्ये २००१ ते २०२० हा असा संघर्षमय प्रवास पाटील यांनी केला असून देशाची सेवा करून आपल्या परिवाराची देखील काळजी घेणे ही समाजातील फार कठीण बाब आहे. अशा संघर्षमय प्रवासातून पाटील यांचा प्रवास झाला आहे. तब्बल एकवीस वर्षे देशाची सेवा करून अजून देखील जोपर्यंत या देशाची सेवा करता येईल तोपर्यंत सदैव तत्पर राहू असे जितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. खानदेशी रक्षक दल या संस्थेच्या माध्यमातून मंगळवार दि. ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थापक सचिन पाटील, समाधान सूर्यवंशी, सेक्रेटरी राहुल रावते सरचिटणीस प्रवीण महाजन संयोजक मनोहर महाले तसेच आधी मंडळींची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले तर आभार सौमित्र पाटील यांनी मानले.