Home आरोग्य पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी नवीन ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी नवीन ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले


पिंपरी (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नवीन ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात १९ वर्षीय तरुण, ३१ आणि ३३ वर्षीय पुरुष तर ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 

पिंपरी-चिंचवडमध्ये शहरातील कोरोना बाधितांचा ऐकून आकडा ४९ वर पोहचला असून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर ३७ जणांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे राज्य सरकार आणि सरकारच्या यंत्रणांनी आक्रमकपणे केलेल्या लढाईला यश येऊ लागले आहे. मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत घट झालीय. तर पूर्ण बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे.


Protected Content

Play sound