पावसात भिजून निघाला दिपोत्सव

जळगाव प्रतिनिधी । संततधार पावसाने जिल्हाभरात हजेरी लावल्यामुळे यंदाचा दिपोत्सव हा अक्षरश: भिजून निघाल्याचे दिसून आले.

यंदा दिवाळी आली तरी पाऊस कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत. यामुळे ज्वारी, बाजरी, मका आदींसारख्या पिकांचा हाती-तोंडी आलेला घास हिरावून घेण्यात आल्याने बळीराजा नैराश्याच्या गर्तेत गेल्याचे दिसून येत आहे. यातच ऐन दिवाळीत कुठे मुसळधार तर कुठे रिमझीम पाऊस असल्यामुळे निरूत्साह दिसून आला. जळगावात रात्री आठ वाजेपर्यंत हा निरूत्साह दिसून आला. नंतर मात्र पाऊस थांबल्याने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, याच प्रकारे अनेक ठिकाणी पावसामुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून आले.

Protected Content