धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यात पाळधी येथे आज एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला असून याला निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.
आज सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला आहे. या वृत्ताला निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. या रूग्णांचा निवास असणार्या परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यात आजवर १९० रूग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यातील १८ जणांना मृत्यू झालेला आहे. आजवर ११३ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून ५८ पेशंटवर सध्या उपचार सुरू आहेत.