पाळधी येथील बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविली.

जामनेर तालुक्यातील पाळधी गावात बंद घर फोडून घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबत पहुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पहुर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुंडलिक रामलाल भुसारी (वय-३२, रा. गोविंद महाराज चौक, पाळधी ता.जामनेर) हे आपल्या परिवारासह मास्तव्याला आहे. मिस्तरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात १६ फेब्रुवारी रात्री ९.३० वाजता ते जेवण करून घरात झोपलो होते. त्यावेळी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील रोकड व दागिने असा एकूण ३० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविला. हा प्रकार शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला. या संदर्भात पुंडलिक भुसारी यांनी पहुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

Protected Content