रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाल आदिवासी भागात वादळी पावसाने झालेल्या पडझड व नुकसानीची आज तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणी केली. यावेळी संबधित तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी ३१ मे रोजी सायंकाळी आदिवासी भागात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त झाले होते. यावेळी रावेर तालुक्याचे तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केली. यामध्ये पाल, लालमाती, सहस्त्रलिंग आदीत नुकसानग्रस्त गावांचा समावेश आहे. तसेच चिनावल व कुंभारखेडा येथे कोरोना पोझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने कंटरमेंट झोन परिसराची देखिल पाहणी केली. आदिवासी भागात किती नुकसान झाले आहे. याची पंचनामे झाल्यावर देणार असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले.