धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश प. पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे पाळधी नगरीत स्वागत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
प.पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे पाळधी नगरीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी आ. चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, शरद काका कासट, दिनकर आधार पाटील, मोती आप्पा पाटील, भागवत पाटील, धनंजय कासट, सरपंच प्रकाश नाना पाटील, चंदन कळमकर, केंद्र प्रमुख महेश पाटील, राकेश मकवाणी व भाविक उपस्थित होते.