जळगाव-पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मायेने जवळ घेत अजिंठा शासकीय विश्रामगृहातील रोजंदारी कर्मचारी जय गवळी याच्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. मागिल पाच महिन्यात कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात सेवा बजावणारा जय गवळी हा देखील कोरोना योद्धाच म्हणावा लागेल असे गौरवोद्गार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढल्याने जयसह अन्य कर्मचारीही भारावले.
जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात जय गवळी हा रोजंदारी कर्मचारी म्हणून कामावर आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात देखील जय गवळी याच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य व्हीआयपिंच्या दौऱ्यात व दैनंदिन कामकाजात जय गवळी सेवा देत आहे.
आज मंगळवारी जय यांचा वाढदिवस असल्याचे समजताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्याला जवळ बोलावुन शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. यावेळी जनाआप्पा कोळी, बंदुदादा नारखेडे, मेजर प्रवीण पाटील, सतीश जाधव, किशोर पगारे, सूर्यभान बारहे, पोलीस स्कॉफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.