धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आज भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त श्री सकल जैन संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ८ वाजता भ.महावीर चौकातून अहिंसा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सर्वात पुढे जैन समाजाचे संत उपस्थित होते,व नंतर ४००/५०० पुरुष/महिला व तरुणांनी आपला सहभाग नोंदवला. अहिंसा रॅली मध्ये भ.महावीरांच्या जयघोषाने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
रॅली नंतर श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात अध्यक्ष राहुल जैन,तसेच संघपती सुमित संचेती, मूर्तिपूजक अध्यक्ष किशोर डेडीया यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झेंडावंदन करण्यात आले. नंतर भ. महावीर जयंती निमित्त जैन संत आचार्य भगवंत यांचे प्रवचन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सकल जैन संघाचे अध्यक्ष अजयशेठ पगारीया यांनी केले. या नंतर माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार अध्यक्ष राहुल जैन, किशोर डेडिया, सुमित संचेती यांनी पुष्पहार, बुके व राजस्थानी पगडी देउन केला. या प्रसंगी मंचावर गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, सी.के.पाटील,श्री.कैलास माळी सर, संजय महाजन, विनय उर्फ पप्पु भावे, वासुदेव चौधरी.भानुदास विसावे, भोलाने बापू, सुरेश भागवत, विलास महाजन, वाल्मीक पाटील, राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी, धिरेंद्र पुरभ, भरत चौधर, दिपक वाघमारे, रवि महाजन,विनोद रोकडे तसेच पोलीस निरीक्षक उध्दव ढमाले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते व त्यांचा सत्कार जैन समाजाचे पंच व गो सेवा समिती तर्फे करण्यात आला.
मा.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इ.१० मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्व.लिलाबाई पुनमचंद पगारिया यांच्या स्मरणार्थ बक्षीस वितरण करण्यात आले.
नंतर माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन समाज व भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव निमित्त आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले. व अहिंसा, सत्य व त्याग या बद्दल जैन समाजाचे कौतुक करून हे सर्वांनी अंगीकारले पाहिजे,अशा भावना व्यक्त केल्या. तसेच शाकाहार हीच आजच्या काळाची गरज असल्याची भावना पण व्यक्त केली. नंतर मंत्री महोदयांनी आपल्या गो शाळेस रूपये ५१००० इतकी मदत स्वतः दिली,व नगरपालिका द्वारा छ २ लाखांचा चेक कामधेनू गोशाळेचे अध्यक्ष प्रा.श्री.सी. एस. पाटील सर व राजू ओस्तवाल यांना सुपूर्द केला. त्यावेळी सकल जैन समाजाने टाळ्यांच्या गजरात मंत्री महोदयांचे कौतुक केले.
या नंतर काही प्रमुख मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले.सकल जैन संघ धरणगाव व गो सेवा समिती तर्फे डॉ.मिलिंद डहाळे यांनी उपस्थित मान्यवर व सर्व गो सेवा म्हणून दान स्वरूपात देणगी देणार्या सर्वांचे तसेच कार्यक्रमास उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
मंदिरातील कार्यक्रमानंतर भगवान महावीर चौकाचे भव्य असे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री आदिनाथ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष श्री.राहुल जैन, सचिव श्रेयान्स जैन,उपाध्यक्ष प्रतीक जैन, सावन जैन, अजयशेठ पगारिया,डॉ.मिलिंद डहाळे तसेच प्रवीण कुमट, संजय ओस्तवाल, बबलू कोठारी, सुशील कोठारी, राजमल संचेती, हेमंत ओस्तवाल, अक्षय मुथा, भानुदास विसावे, दिपक संचेती ोलाने बापू,सकल जैन समाज बांधव व शहरातील मान्यवर मंडळी तसेच पत्रकार भगीरथ माळी , धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर उपस्थित होते.
दुपारी १२ वाजता भ.महावीरांचा पाळणा (जन्म महोत्सव) मंदिरात राजुलमती महिला मंडळाद्वारा साजरा करण्यात आला. व नंतर महाप्रसादाचे आयोजन मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. व सायंकाळी रथावर भगवान महावीरांचा फोटो लावून व रथ सजवून भव्य अशी मिरवणूक ढोल-ताश्यांचा गजरात काढण्यात आली. तरुण मंडळींनी लेझीम खेळून,व महिलांनी गरबा नृत्य सादर केले. त्यानंतर समारोप श्री आदिनाथ जैन मंदिरात करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल जैन समाजाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योगदान मिळाले.