फैजपूर, प्रतिनिधी । पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर शहर शिवसेना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर मधील सर्व समाज बंधु- भगिनींनी पेढे आणि बिस्किटे वाटप करून वाढदिवस साजरा केला व हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील फैजपूर नगरपालिकासाठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन २०२१-२२ मधील प्रस्तावित ५३ लाख रुपयांच्या निधी प्रस्तावित केल्या बद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मातंग समाजाने आभार मानले. या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी दिल्यात.सामाजिक कार्यकर्ते, तथा विभागीय उपाध्यक्ष तेली समाज भारत चौधरी, शिवसेना उप शहर प्रमुख मनोज चंदनशिव, सुनील बिऱ्हाडे, रवि बिऱ्हाडें, अरुण बिऱ्हाडें, अरुण भोई, अतिष बिऱ्हाडें, तुषार रावते, विमल बिऱ्हाडें, रेखा बिऱ्हाडें, समस्त मातंग समाज बांधव उपस्थित होते.