पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ३४ महिलांना धनादेश वाटप !

 

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील ३४ महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. या अर्थ सहाय्यमधून शक्यतो मुलांच्या शैक्षणिक कामी खर्च करण्याचे नम्र आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी तहसील कार्यालयात केले.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. याअंतर्गत जळगाव तालुक्यातील ३४ महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ६ लाख ८० हजाराचे प्रस्ताव मंजूर असून सदर धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

Protected Content