पारोळा प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात गरीब गरजूंना उपासमारीची वेळ येवू नये म्हणून शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत शहरात लाभार्थ्यांना मोफत तांदूळाचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे रोजंदारीवर जाणाऱ्या हातमजूर व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोणताही घटना उपासी राहू नये यासाठी शासनच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पारोळा शहरातील दुकान नं.७३ स्वस्त धान्य दुकानात १९ रोजी लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करण्यास सुरुवात आली.
लाभार्थी प्रति व्यक्तीस पाच किलो प्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक नवल (भैय्या) नामदेव चौधरी व नगरपालिकेचे कर्मचारी हिंमत पाटील व भूषण टिपरे नामदेव चौधरी यांचेसह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. या वाटप दरम्यान ‘सोशल डिस्टिंक्शन’ चे काटेकोरपणे पालन करण्यात आले. शासनाच्या वतीने हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकाना प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे.