पारोळा प्रतिनिधी । शहरातील ट्रेडींग कंपनीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानात ठेवलेली ६९ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश सागरमल लुनावत (वय-५०) रा. पारोळा यांचे कजगाव नाक्यावर वर्धमान ट्रेडिंग कंपनीचे दुकाना आहे. २८ जून रात्री २ ते २९ जून सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील कॉऊंटर ड्रावरमधील ठेवलेले ६९ हजार ५०० रूपयांची रोकड लंपास केले. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील करीत आहे.