पारोळा व एरंडोल क्रीडा संकुलाची आमदारांकडून पाहणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा-एरंडोल येथील तालुका क्रीडा संकुलाचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी अजून निधीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने तातडीने शासनाला प्रस्ताव सादर करण्याचा सूचना आ.चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

दोनही तालुक्यातील क्रीडापटूंसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या येथील क्रीडा संकुलांचे काम रखडल्याने तरुणांना मैदानी तालीमेसाठी कुठेही हक्काचे मैदान उपलब्ध नसल्याने क्रीडापटूंमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दोन्ही तालुक्यातील खेळाडूंचा सर्वांगीण विकासासाठी शासन, प्रशासन व लोकप्रतीनिधी यांना परस्परांमध्ये समन्वय घडवून आणत क्रीडासंकुल तातडीने सुरु करावे, अशी मागणी क्रीडापटूंमधून सतत होत होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांचेशी आ. चिमणराव पाटील यांनी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला, त्यांना पारोळा व एरंडोल क्रीडा संकुलाच्या अपूर्ण राहिलेल्या कामासह इतर नविन कामांसाठी माझ्या समक्ष प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक बाबींचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव तयार करण्याचा सूचना केल्या.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तातडीने दाखल घेत संबंधित तालुका क्रीडा अधिकारी यांना आमदारांसमवेत पाहणी करण्याचे आदेश दिले व त्याची आ. चिमणराव पाटील यांनी जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, पारोळा तहसिलदार अनिल गवांदे, एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण, एरंडोल तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, पारोळा शहरप्रमुख डॉ.मंगेश तांबे, मा.सभापती शालिक गायकवाड, एरंडोल युवसेना तालुकाप्रमुख बबलू पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष विजय महाजन, पारोळा तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, एरंडोल तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, एरंडोल मुख्याधिकारी विकास नवाळे, सा.बां. पारोळा शाखाअभियंता सूर्यवंशी, एरंडोल सा.बां. उपअभियंता अक्षय पगारे, पारोळा मा.शहरप्रमुख बापू मिस्तरी, पारोळा विकासो संचालक विनोद खाडे, विजय निकम, पारोळा क्रीडा समन्वयक गोविंदा जाधव, पारोळा मा.नगरसेवक राजू कासार, एरंडोल मा.नगरसेवक प्रा.मनोज पाटील, चिंतामण पाटील, विठ्ठल आंधळे, संजय चौधरी, एरंडोल शहर संघटक मयूर महाजन, प्रवराज पाटील, गुड्डू जोहरी यांचेसमवेत पाहणी केली.

एरंडोल व पारोळा तालुक्यासह जिल्ह्यात शासनाने १९९७ मध्ये निधीची तरतूद केली होती. मध्यंतरीच्या काळात यावर कुणीही लक्ष केंद्रित केले नाही. नंतर आ. चिमणराव पाटील यांनी गत काळात म्हणजेच २००९ मध्ये योग्य तो पाठपुरावा केल्याने दोनही तालुक्यांसाठी प्रत्येकी १ कोटीचा निधी खेचून आणला. यानिधीमध्ये दोनही तालुक्यांच्या इमारतीसह इतर कामे करण्यात आली मध्यंतरीच्या काळात शासनाच्या हलगर्जीपणामुळे पुढील काम झालेच नसल्याने इमारत तशीच धुळखात पडली. आता पाहणी केल्यानंतर आमदार चिमणराव पाटील यांनी दोनही क्रीडा संकुलांसाठी अपूर्ण कामांतील विद्युत पुरवठा, पाण्याची व्यवस्था, सुरक्षा रक्षक कॅबिन, कबड्डी, खो-खो, टेनिस मैदान खेळाडूंसाठी विश्रांतीगृह, आवश्यक क्रीडा साहित्य यांसह इतर कामांचा एकूण प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार चिमणराव पाटील यांनी केल्या. आमदार चिमणराव पाटील यांनी गेल्या १० दिवसांपूर्वीच खेळाडूंना प्रोत्साहित करणेसाठी जिल्ह्यात आकर्षण ठरलेली भव्य कब्बडी स्पर्धा आमदार चषक स्पर्धेचे एरंडोल येथे आयोजन केले होते.

 

यात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील तरुणांनी भाग घेतला होता. असेच खेळाडूंनी प्रोत्साहीत होवून यापुढेहि मैदानी खेळात सहभाग नोंदवावा हाच उद्देशाने आमदार चिमणराव पाटील प्रयत्न करीत असतात. खेळाडूंना कायमस्वरूपी मैदान उपलब्ध व्हावे यासाठी आता आमदार चिमणराव पाटील जोमाने पाठपुरावा करीत आहेत.तसेच आगामी पोलीस भरती, सैन्यदल भरती आदी मैदानाशी संलग्न असलेल्या भरतींना सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत आवश्यक त्याबाबी तातडीने पूर्ण करून खुल्या मैदानी तालीमेसाठी तरुणांना मैदान उपलब्ध करून देण्याचा सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. व उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी राज्याचे लाडके तथा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करून दोनही संकुल अद्ययावत स्वरुपात तातडीने कसे उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील सांगितले.

Protected Content