पारोळा येथे शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी उपोषण

 

पारोळा प्रतिनिधी । आज स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसह पारोळा तहसील कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण केले. आमदार चिमणराव पाटील यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले.

तहसील कार्यालय येथे स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी मध्यस्थी करत उपोषणकर्त्यांना मागण्या मान्य होणेसाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले व उपोषणकर्त्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या मध्यस्थीने व दिलेल्या आश्वासनाने उपोषण मागे घेतले. याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे, नगरपरिषद प्रतिनिधी संदानशिव मॕडम, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, मिलिंद मिसर,व शेतकरी पृथ्वीराज पाटील, किशोर पाटील, सुनील देवरे, भिकनराव पाटील, संजय वाल्हे, जितेंद्र वानखेडे, भुषण पाटील, भाऊसाहेब सोनवणे, राहुल साहेबराव, उमेश पाटील, खुशाल श्रावण भुषण पाटील, पंकज पाटील, म्हसवे नाना पाटील, मनोहर केदार, सचिन पाटील, रावसाहेब भोसले, हरेश चव्हाण, संदीप पाटील, भूषण माने, नवल पाटील, नितीन देसले, नीलेश चौधरी, गणेश पाटील, गुलाब पाटील, भरत सिंह राजपूत, प्रमोद पाटील, सतीश पाटील, रवींद्र पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. उपोषणास भीम आर्मी संघटना व छावा संघटनेचा पाठिंबा दर्शविला होता. उपोषणस्थळाला जिल्हा परिषद सदस्य हर्षलमाने यांनी भेट दिली.

Protected Content