पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे येथील जि.प.शाळेत समता पंधरवाडाचे आयोजन करण्यात येते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त घरीच प्रतिमेचे पुजन अभिवादन केले. तसेच मुख्याध्यापकांनी यांनी संदेश म्हणुन एक दिवा ज्ञानाचा लेखन करुन फलक लावला.
राज्य आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व महात्मा ज्योतीराव फुले, गुरु गौरव आदर्श पुरस्कार विजेते वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे दरवर्षी महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाळेत समता पंढरवडाचे आयोजन करतात. रोज या संदर्भात काही वेळ वेगवेगळे कार्यक्रम घेवुन या थोर महात्मांचे जीवनकार्य विदयार्थी व ग्रामस्थांसमोर मांडुन जागृती व समानतेची भावना निर्माण करतात. सध्या लॉकडाऊनमुळे हे शाळेत करता येत नसले तरी घरी व परिसरात राहणाऱ्या बालकांना त्यांनी याबाबत व्हॉटसअपद्वारा माहिती देणे सुरू ठेवले आहे.
आज महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे त्यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापक साळुंखे त्यांची मुलगी सुप्रभा साळुंखे ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, एक दिवा समतेचा, एक दिवा कोरोनाचा अंधार घालविण्याचा हे संदेश देणारी रांगोळी काढुन दिपक लावले. मुख्याध्यापक साळुंखे यांचे घर बाजाराला लागुन असल्याने महत्वाच्या कामासाठी तिकडुन वापरणाऱ्यांनी अप्रूप वाटुन थांबुन महात्मा ज्योतीराव फुले यांना अभिवादन केले. मुख्याध्यापक साळुंखे म्हणाले सर्व राष्ट्रपुरुष, राष्ट्रमाता, संत, महात्मे यांचे कार्य हे सर्व जगाच्याच कल्याणासाठी होते म्हणुन त्यांचे स्मरण व आदर्श हा धर्म, जातपात, पंथ, प्रांत,भाषा विरहित मानुन सदैव ठेवावे. त्याचीच आज संपुर्ण जगाला गरज आहे.