पारोळा प्रतिनिधी । तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे आज जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शहरातील झाशीची राणी लक्ष्मीबाई किल्ल्यामध्ये कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले.
यावर्षी कोरोनाच्या महासंकटामुळे हा दिवस मोजके फोटोग्राफरांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्व फोटोग्राफरांनी कॅमेरा पूजन केले.
यावेळी संजय चौधरी, रुपेश हजारे, योगेश महाजन, घनःशाम नेटारे, लहु महाजन, किशोर महाजन, ज्ञानेश्वर बारी, नयन भावसार, सुनिल पाटील, किशोर खैरनार, जगदिश गुरव, संदिप पाटील, जयेश खैरनार, चिकु महाजन, दादु सरदार, सचिन भोई, अविनाश भोई, अनिल महाजन, बापु महाजन, वसिम पठाण उपस्थितीत होते.